डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन डाऊनलोड कसा करावा?
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व ई-रेकॉर्डस मोबाइलद्वारे ऑनलाईन त्वरित मिळवणे खूप सोपे झाले आहे. ही कागदपत्रे आपण शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू किंवा डाऊनलोड करू शकतो. या digitally signed कागदपत्रांचा उपयोग कायदेशीर आणि शासकीय कामांसाठी केला जातो. जसे की, शेतीविषयक योजनांसाठी.
सर्वप्रथम आपण आपल्याला मोबाइलमध्ये chrome browser open करा. search bar मध्ये digitalsatbara type करा. तुम्हाला शासनाची अधिकृत वेबसाईट दिसेल, https://digitalsatbara.mahabhumi.gov.in त्यावर click करा. शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळामुळे कागदपत्रे घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचतो.
तुम्हाला new user registration हा पर्याय दिसेल त्यावर click करा. व्यक्तिगत माहिती देऊन registration करने अनिवार्य आहे , त्याशिवाय आपण कुठलेही कागदपत्रे पाहू किंवा डाऊनलोड करू शकत नाही.
new registration करत असतांना तुम्हाला समोर दाखवल्याप्रमाणे माहिती भरावी लागते. personal information मध्ये first name, middle name, last name, gender, nationality, mobile number, occupation, email ID, DOB. address information मध्ये flat no, floor number, building name, pincode, street road, location, city area, district, state. login information मध्ये login ID स्वतः बनवून check availability या बटणावर click करायचे आहे. स्वतःहून password बनवायचा आहे. captcha fill करून येथे तुमचे registration पूर्ण होते. त्यानंतर thank you registration complete असे दाखवले जाईल. आता click here या बटणावर click करा.
आता back जाऊन login ID, password व captcha टाकुन लॉगिन या बटणावर click करायचे आहे.
digitally signed 7/12 काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, District, taluka, village, survey no/ gat no. आपल्याला सातबारावर पीक पहाणीचा डाटा हवा असेल तर, तुम्हाला तीन पर्याय दिले आहे. 1) पीक पहाणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षांचा डाटा 2) पीक पहाणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा 3) पीक पहाणी ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षांचा डाटा यातील एक पर्याय निवडून document download करू शकता.
digitally signed 8A काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, District, taluka, village, khata no. त्यानंतर download या बटणावर click करा.
digitally signed eFerfar काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, District, taluka, village, ferfar no. त्यानंतर download या बटणावर click करायचे आहे.
digitally signed property card काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, region, District, office, village, CTS no. आता all entry व live entry यांपैकी एक पर्याय निवडा. त्यानंतर download या बटणावर click करा.
digitally signed eRecords काढण्यासाठी आपल्याला पुढील माहिती भरावी लागते. जसे की, office, District, taluka, village, document.
कागदपत्रे पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी शुल्कसुद्धा लागते. तुमच्या account मध्ये recharge करण्यासाठी तूम्हाला recharge account या पर्यायावर click करायचे आहे.
payment status या पर्यायावर click करून तुम्ही केलेले recharge check करू शकता.