Skip to main content

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

     चाफ कटर पशुपालनासाठी खूप उपयोगी मशीन आहे. या मशीनचा उपयोग जनावरांचा चारा बारीक करण्यासाठी होतो. पशुपालन व्यवसायाच्या विकासासाठी या चाफ कटर मशीनची महत्त्वाची भूमिका आहे. चाफ कटर मशीनला कुट्टी मशीन असे देखील म्हणतात.

    चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा लागतो. त्यासाठी या पोर्टलवर सर्वप्रथम registration complete करावे लागते तरच अर्ज करता येतो. अर्ज प्रक्रिया ही शेतकर्‍यांना अगदी सोपी व सोईस्कर बनवण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती/ अल्पभूधारक शेतकरी व बहुभूधारक शेतकरी/ महिला शेतकरी यांना 50% सब्सिडीवर तर इतर शेतकऱ्यांसाठी 40% सब्सिडी आहे. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाइलवरुन किंवा तालुक्याच्या कृषि सहाय्यक यांच्याकडून किंवा csc centre वर जाऊन पूर्ण करू शकता. अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने होईल व या प्रक्रियेत थोडा वेळही लागु शकतो. तुमची निवड झाल्यास तुम्हाला message द्वारे कळविण्यात येईल व तुम्ही संकेतस्थळावर जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता. येथे तुम्हाला winner झाल्याची व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करा अशी माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्हाला 10 दिवसाच्या आत कागदपत्रे upload करावी लागतात नाहीतर अर्ज बाद केला जातो. या कागदपत्रांमध्ये सातबारा, 8अ, कोटेशन व बिल upload करावे लागतात. पूर्वसंमती पत्र या पर्यायावर click केल्यावर आपल्याला सर्व माहिती कळते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, अगोदर वस्तू स्वखर्चाने विकत घ्यावी लागते नंतरच अनुदानाची रक्कम खात्यात जमा केली जाते. अनुदानाची रक्कम खात्यात जमा होण्यास विलंबसुद्धा होऊ शकतो. आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहूया.

    सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाइलमधील chrome browser open करायचे आहे. त्यानंतर search मध्ये mahadbt farmer login असे type करून search करायचे आहे. येथे आपल्याला सुरुवातीला mahadbt.maharashtra.gov.in ही अधिकृत website दिसेल, त्यावर click करा. आता तुम्हाला अर्जदार लॉगिन हा पर्याय दिसत असेल त्यावर click करा.

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    येथे अर्जदार लॉगिन प्रकार निवडायचा आहे. जसे की, वापरकर्ता आयडी / आधार क्रमांक.

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    लॉगिन झाल्यावर अर्ज करा असा पर्याय दिसेल त्यावर click करा.

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    बाबी निवडण्यासाठी काही पर्याय दिले आहेत. जसे की, 1) कृषि यांत्रिकीकरण, 2) सिंचन साधने व सुविधा, 3) बियाणे, औषधे व खते 4) फलोत्पादन, 5) सौरकुंपण. या पर्यायांसमोर विविध योजना दाखवल्या आहे त्यावर click करून योजनांची माहिती, पात्रता, कागदपत्रे, सब्सिडी यांविषयी माहिती मिळवू शकता. या पर्यायांपैकी आपल्याला 1) कृषि यांत्रिकीकरण या पर्यायातील बाबी निवडा या बटणावर click करायचे आहे.

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    आता यंत्रणेविषयी माहिती निवडायची आहे. आपण चाफ कटर / कुट्टी मशीनसाठी पुढील पर्याय निवडणार आहोत, 1) मुख्य घटक - कृषि यंत्र औजारांच्या खरेदीस अर्थसहाय्य, 2) तपशील - मनुष्य चलित औजारे, 3) यंत्रसामग्री, अवजारे / उपकरणे - फॉरेज / ग्रास अॅण्ड स्ट्रॉ / रेसिड्यू मॅनेजमेंट ( कटर / श्रेडर), 4) मशीनचा प्रकार - चाफ कटर ( upto 3 feet ). खाली दिलेल्या checkbox वर click करून जतन करा या बटणावर click करा. येथे आपली बाब समाविष्ट केल्याची सुचना दाखवली जाईल व आणखी काही घटक जोडायचे असल्यास हो / नाही असे बटन दिले आहे, पण आपल्याला सध्या फक्त चाफ कटर मशीनसाठी अर्ज करायचा आहे त्यामुळे नाही या बटणावर click करा.

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला अर्ज सादर करा असे बटन दिले जाईल त्यावर click करा.

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    आता एक सूचना येईल, ती सूचना व्यवस्थित वाचून OK या बटणावर click करा. त्यानंतर पहा या बटणावर click करायचे आहे. जर या अगोदर आपण काही बाबींसाठी अर्ज केला असेल तर प्राधान्यक्रम निवडायचा आहे. जसे की 1, 2, 3 इत्यादी. जर हा तुमचा पहिलाच अर्ज असेल तर प्राधान्यक्रम फक्त 1 टाका. खाली checkbox दिसेल त्याला tick mark करून अर्ज सादर करा या बटणावर click करा. येथे तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा message येतो व सूचना देखील दिली जाते त्यावर OK click करा. अश्याप्रकारे येथे तुमचा अर्ज पूर्ण झाला आहे.

    सध्या निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने चालू आहे. लॉटरी यादीत नाव येण्यास म्हणजेच निवड होण्यास काही महिने देखील लागू शकतात. निवड झाल्यास तुम्हाला message द्वारे कळविण्यात येते किंवा तुम्ही मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर click करून तुमच्या अर्जाचे स्टेटस check करू शकता.

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    येथे click केल्यावर आपल्याला पुढील पर्याय दिसेल, अर्जाची प्रलंबित फी, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज, नाकारलेले अर्ज. आपल्याला छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर click करायचे आहे. येथे आपल्याला अर्ज पाहता येतो, अर्ज रद्द करता येतो, अर्जाची पोहोच पावती मिळवता येते, फी ची पावती मिळवता येते व अर्जाची सद्यस्थिती बघता येते.

चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?