शेतकर्यांना शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कृषि यंत्रणा सब्सिडीवर अर्थसहाय्य म्हणुन उपलब्ध करून दिली जाते. यांपैकी सध्या सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपाविषयी आपण मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा हे बघणार आहोत. या पंपाची रचना बॅटरी चलित पंपासारखीच असून, या पंपाला सौरप्लेट जोडलेली असते. या अगोदर शेतकर्यांना बॅटरी चलित पंप 100% सब्सिडी वर उपलब्ध करून देण्यात आला होता व आता सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपसुद्धा 100% सब्सिडीवर उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ही अर्ज प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाइलवरुन सुद्धा पूर्ण करू शकता. जर तुम्हाला अर्ज प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषि सहाय्यक किंवा csc centre शी contact करू शकता. लॉटरी प्रक्रियेमध्ये निवड झाल्यास message द्वारे कळविण्यात येते, त्यानंतर कागदपत्रे upload करून तुम्हाला योजनेचा लाभ दिला जातो. अधिक माहितीसाठी तुम्ही mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. mahadbt farmer login या पर्यायावर click करून शेतीविषयक योजनेची माहिती घेऊ शकता. तसेच योजनेसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, सब्सिडी व इतर सर्व अधिकृत माहिती तुम्हाला pdf च्या स्वरुपात उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी fees approx 23 रुपये असते व त्यानंतर तुम्ही विविध घटकांसाठी अर्ज करू शकता. लॉटरी प्रक्रियेमध्ये निवड होण्यास थोडासा वेळ लागु शकतो, त्यामुळे आपण आवश्यकतेपूर्वीच अर्ज केलेला बरा! जेणेकरून आवश्यकतेवेळी विकत घेण्याची गरज पडणार नाही. तर चला मग पाहूया अर्ज प्रक्रिया कशी असते!
सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या मोबाइलमधील chrome browser open करायचे. त्यानंतर mahadbt farmer login type करून search करायचे. त्यानंतर आपल्याला mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर visit करायचे आहे. आपण या संकेतस्थळावर आल्यावर आपल्याला अर्जदार लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावर click करायचे, परंतु या अगोदर तुमचे mahadbt वर registration असणे गरजेचे आहे.
आता लॉगिन करण्याचा प्रकार निवडायचा आहे. लॉगिन करण्यासाठी तुम्ही वापरकर्ता आयडी किंवा आधार नंबर वापरु शकता.
लॉगिन केल्यावर अर्ज करा हा पर्याय दिसेल त्यावर click करा.
आता तुम्हाला काही sections दाखवण्यात येतील त्यामध्ये 1) कृषि यांत्रिकीकरण, 2) सिंचन साधने व सुविधा, 3) बियाणे, औषधे व खते, 4) फलोत्पादन असे पर्याय राहील. त्यातील 1) कृषि यांत्रिकीकरण या पर्यायातील बाबी निवडा या बटणावर click करा.
त्यानंतर आपल्याला आवश्यक असलेल्या बाबीविषयी माहिती भरायची आहे. यात मुख्य घटक, तपशील, यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे, मशीनचा प्रकार याविषयी अंमलबजावणी करण्यासाठी माहिती द्यायची आहे. सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी आपण पुढीलप्रमाणे माहिती भरणार आहे, मुख्य घटक कृषि यंत्र औजारांच्या खरेदीस अर्थसहाय्य, तपशील मनुष्य चलित औजारे, यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे पीक संरक्षण औजारे आणि मशीनचा प्रकार सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप असा निवडणार आहे. आता checkbox भरून जतन करा या बटणावर click करा, त्यानंतर आपली बाब समाविष्ट झाल्याची सुचना दाखवली जाईल. या सूचनेत आपल्याला आणखी घटक निवडायचे का? असे विचारले जाईल, अश्यावेळी नाही या बटणावर click करा.
आता तुम्ही समोरील पृष्ठावर येणार, येथे अर्ज सादर करा हे बटन दिसेल त्यावर click करा.
यावेळी तुम्हाला एक सूचना देण्यात येईल, या सूचनेला वाचून OK या बटणावर click करा. त्यानंतर पहा या बटणावर click करा. आता प्राधान्यक्रम निवडा. checkbox भरून अर्ज सादर करा या बटणावर click करा. येथे आपला अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची सूचना येईल त्यावर OK दाबा. तुम्हाला अर्ज यशस्वीरित्या सादर केल्याचा message सुद्धा येईल, अश्याप्रकारे येथे तुमचा अर्ज पूर्ण होतो.
जर तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासायची असेल तर तुम्ही मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर click करा. येथे आपल्याला आपल्या अर्जाची सद्यस्थिती कळते. मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर click केल्यावर आपल्याला काही पर्याय दाखवण्यात येतील, जसे की, अर्जाची प्रलंबित फी, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज, नाकारलेले अर्ज इत्यादी. त्यातील छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर click केल्यावर आपल्याला आपल्या अर्जाची माहिती, अर्ज स्थिती, छाननी स्थिती, अर्ज रद्द करा, अर्ज पहा, पोहोच पावती, फी ची पावती असे सर्व पर्याय मिळतील त्यावर click करून माहिती मिळवू शकता.
तुम्हाला इतर कोणकोणत्या बाबींसाठी अर्ज करता येईल याविषयी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती काढू शकता, तसेच आमचे इतर articles सुद्धा वाचू शकता. तुम्हाला ज्या घटकांसाठी अर्ज करायचा त्या घटकांविषयी सविस्तर माहिती व मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा? या विषयी सविस्तर articles उपलब्ध आहे.