शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे कृषि विभागाच्या माध्यमातून शेती विषयक बाबींसाठी सब्सिडी दिली जाते. ही subsidy वस्तूच्या जवळपास मूळ किमतीच्या निम्या व काही अटी-शर्ती लागू करून दिली जाते. ही subsidy शेतकर्यांना अर्थसहाय्य म्हणुन दिली जाते. आपण इलेक्ट्रिक मोटरसाठी अर्ज करणार आहे. इलेक्ट्रिक मोटर या घटकासाठी तोच शेतकरी पात्र होण्याची शक्यता असते ज्याच्याकडे सातबार्यावर एखाद्या पाण्याच्या स्रोताची नोंद असते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे 55% तर इतर शेतकऱ्यांसाठी 45% असा subsidy criteria आहे. जवळपास अर्ध्या किमतीत वस्तू पडते असे म्हणले तरी चालेल. अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण अर्ज स्वतःच्या मोबाइलमधून सुद्धा करू शकतो. अर्ज करण्याची प्रक्रिया online ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला form भरने जमत नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषि सहाय्यक किंवा csc centre यांची मदत घेऊ शकता. शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी व सोईस्कर बनवण्यात आली आहे, जेणेकरून कुठलाही शेतकरी सहजरीत्या अर्ज करू शकेल. निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने होते, तुमचे नाव लॉटरी यादीत येण्यास थोडा वेळही लागु शकतो. जेव्हा तुमचे लॉटरी यादीत नाव येते म्हणजेच तुमची निवड होते त्यावेळी तुम्हाला निवड झाल्याचा message सुद्धा पाठविण्यात येतो. कदाचित एखाद्या वेळेस चुकून तुमच्यापर्यंत message पोहचला नसेल तर तुम्ही संकेतस्थळावर जाऊन अर्जाची सद्यस्थिती सातत्याने तपासून बघू शकता. तुमची निवड झाल्यावर तुम्हाला message द्वारे कळविण्यात येते आणि समोरील process साठी तुमच्या तालुक्याच्या कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करायला सांगितले जाते. त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे upload करावी लागतात व तुम्ही subsidy चा लाभ घेण्यासाठी पात्र ठरता. आता आपण शेतात पिकांना पाणी देण्यासाठी ज्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करतो त्याच इलेक्ट्रिक मोटर साठी अर्ज करणार आहोत. तर मग चला बघुया अर्ज कसा करायचा ते!
सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाइलमधील chrome browser open करायचे आहे. chrome browser open केल्यावर search बार मध्ये mahadbt farmer login असे write करून search करायचे आहे. त्यानंतर सगळ्यात वर आपल्याला https://mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दिसेल त्यावर click करायचे. click केल्यावर तुम्हाला mahadbt farmer login वर click करायचे आहे. तुम्ही संकेतस्थळावर पोहोचाल. त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावर click करायचे आहे.
आता वापरकर्ता आयडी किंवा आधार otp verify करून लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर तुम्ही समोरच्या पृष्ठावर येणार, तेथे तुम्हाला अर्ज करा असा पर्याय दिसेल त्यावर click करा.
आता तुम्हाला काही sections दाखवण्यात येईल, त्यातील दुसऱ्या number चे section सिंचन साधने व सुविधा यात बाबी निवडा या बटणावर click करायचे आहे.
येथे आपल्याला मुख्य घटक सिंचन साधने व सुविधा, बाब पंपसेट / इंजिन / मोटर, उपघटक इलेक्ट्रिक सिंचन पंप 10 येचपी पर्यंत ( किमान चार स्टार रेट असलेल्या आयएसआय / बीईईसह ) हा पर्याय निवडायचा आहे व त्यानंतर checkbox भरून जतन करा या बटणावर click करायचे आहे.
आता घटक समाविष्ट झाल्याची सूचना येईल व विचारण्यात येईल की तुम्हाला मोटरशिवाय आणखीन काही घटक समाविष्ट करायचे का? अश्यावेळी no या बटणावर click करायचे आहे.
त्यानंतर तुमच्यासोबत एक नवीन interface दिसेल ज्यात अर्ज सादर करा दिसेल, त्या पर्यायावर click करा.
थोड्याच वेळात एक pop-up येईल, त्यातील सूचना वाचून OK या बटणावर click करायचे आहे. या सूचनेत तुम्हाला आणखीन काही घटक जोडायचे असल्यास मेनु वर जा हे बटन देण्यात येईल असे सांगितले जाईल, पण आपल्याला दुसरा कुठलाही घटक जोडायचा नाही त्यामुळे आपण पहा या बटणावर click करणार आहे.
आता आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. जसे की, 1, 2, 3 इत्यादी. त्यानंतर checkbox भरून अर्ज सादर करा या बटणावर click करायचे आहे.
येथे आपल्याला अर्ज यशस्वीरित्या submit झाल्याचा message व सूचना येईल त्यावर OK click करायचे आहे. येथे आपला अर्ज पूर्ण झाला.
जर तुम्हाला तुमचा अर्ज, पोहोच पावती, अर्जाची स्थिति, छाननी स्थिति व इतर गोष्टी बघायच्या किंवा प्रिंट करायच्या असतील तर तुम्ही डाव्या बाजूला दिलेल्या मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर click करायचे आहे, येथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल तसेच अर्ज रद्द करण्याचा पर्यायसुद्धा मिळेल. तुमच्या अर्जात काही चुकी झाली असल्यास cancel या बटणावर click करायचे आहे व otp च्या सहाय्याने हा अर्ज रद्द करून तुम्ही नवीन अर्ज सुद्धा करू शकता.
अश्याप्रकारे इलेक्ट्रिक मोटर या घटकासाठी तुम्ही अर्ज करू शकता, तसेच इतर कोणकोणत्या घटकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे व अर्ज प्रक्रिया कशी राहील हे जाणून घेण्यासाठी इतर articles बघू शकता.