Skip to main content

तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    शेतकर्‍यांना तुषार सिंचन खरेदीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे अर्थसहाय्य म्हणुन subsidy दिली जाते. ही subsidy अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% तर इतर शेतकऱ्यांसाठी 45% आहे. subsidy साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये नाव येण्यास थोडा वेळही लागु शकतो. निवड ही लॉटरी पद्धतीने असते. निवड प्रक्रियेमध्ये जर तुमची निवड होत असेल तर तुम्हाला message द्वारे कळविण्यात येते. message आल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे upload करावी लागतात त्यानंतर समोरील process सुरू होते. जर तुम्हाला अर्ज प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असेल तर तुमच्या तालुक्यातील कृषि सहाय्यकाशी संपर्क करु शकता. जर तुम्हाला स्वतःहून अर्ज करता येत नसेल तर तुम्ही csc centre वर जाऊन फॉर्म भरू शकता. पण, अर्ज करण्याची संपुर्ण प्रक्रिया तुमच्या mobile द्वारे सुद्धा होऊ शकते. तर मग अर्ज कसा करावा ते पाहूया.

    सगळ्यात अगोदर mobile मधील chrome browser open करायचे आहे. chrome browser open केल्यावर mahadbt farmer login असे search करायचे आहे. असे search केल्यावर सगळ्यात पहिले संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in असे दिसेल त्यावर click करा. त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगीन हा पर्याय दिसेल त्यावर click करा.

तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    त्यानंतर तुम्हाला वापरकर्ता आयडी किंवा आधार नंबर टाकुन लॉगिन करायचे आहे.
तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    login केल्यानंतर तुम्हाला अर्ज करा असा पर्याय दिसेल त्यावर click करा.
तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    अर्ज करा या बटणावर click केल्यावर तुम्हाला समोरील पृष्ठावर सिंचन साधने व सुविधा या section मध्ये बाबी निवडा हे बटन देण्यात येईल, त्या बटणावर click करा.
तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    बाबी निवडा या बटणावर click केल्यावर समोरील पृष्ठावर मुख्य घटक निवडामध्ये सिंचन साधने व सुविधा, बाबी मध्ये तुषार सिंचन, उपघटक तुमच्या आवश्यकतेनुसार चल किंवा मिनी sprinkler किंवा लार्ज वॉल्यूम रेन गन किंवा सुक्ष्म तुषार, केप्लर व्यास तुमच्या आवश्यकतेनुसार 63 किंवा 75 किंवा 90, हंगाम खरीप किंवा रब्बी, पीक कापूस किंवा सोयाबीन किंवा ज्वारी किंवा हरभरा निवडा. त्यानंतर प्रस्तावित क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुषारचा उपयोग करायचा आहे ते क्षेत्र हेक्टर आणि आर मध्ये टाका. येवढे केल्यानंतर checkbox भरून घ्या व जतन करा या बटणावर click करा.
तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    येथे तुमचा घटक समाविष्ट केल्याची सुचना दाखवली जाईल, जर तुम्हाला तुषार सिंचनाशिवाय आणखी घटक जोडायचे असेल तर होय या बटणावर click करा. पण आपल्याला फक्त तुषार सिंचन या घटकासाठी अर्ज करायचा आहे, त्यामुळे मी नाही या बटणावर click करत आहे.
    त्यानंतर अर्ज सादर करा या बटणावर click करा. येथे click केल्यावर तुम्हाला एक सूचनाफलक दाखवण्यात येईल व त्या सूचना वाचून OK या बटणावर click करायचे आहे.
तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    आता पहा या बटणावर click करायचे आहे.
    त्यानंतर प्राधान्यक्रम निवडायचा आहे. जसे की, 1, 2, 3 इत्यादी. आता checkbox भरून अर्ज सादर करा या बटणावर click करा. येथे आपण केलेल्या घटकासाठी यशस्वीरीत्या अर्ज सादर झाल्याचा message व सूचना दाखवली जाईल, या सूचनेला आपण OK बटन दाबून प्रतिसाद द्यायचा आहे. अश्याप्रकारे आपला येथे अर्ज पूर्ण झाला.
    जर आपल्याला आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासाची असेल तर डाव्या बाजूला मी अर्ज केलेल्या बाबी या option वर click करायचे. येथे click केल्यावर आपल्याला आपल्या अर्जाची सद्यस्थिती बघता येते, छाननी स्थिति बघता येते, अर्जाची पोहोच पावती मिळवता येते, अर्ज पहा या बटणावर click करून आपण आपला संपूर्ण अर्ज बघू शकतो आणि अर्ज रद्द करायचा असेल तर तो देखील करता येतो.
तुषार सिंचन सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?
    ज्या प्रकारे आपण तुषार सिंचन या घटकासाठी अर्ज केला आहे त्याच प्रकारे आपण इतर घटकांसाठी सुद्धा अर्ज करू शकतो. तसेच आपण इतर कोणकोणत्या घटकांसाठी अर्ज करू शकतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण इतर articles सुद्धा बघू शकता.