चाफ कटर पशुपालनासाठी खूप उपयोगी मशीन आहे. या मशीनचा उपयोग जनावरांचा चारा बारीक करण्यासाठी होतो. पशुपालन व्यवसायाच्या विकासासाठी या चाफ कटर मशीनची महत्त्वाची भूमिका आहे. चाफ कटर मशीनला कुट्टी मशीन असे देखील म्हणतात. चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा लागतो. त्यासाठी या पोर्टलवर सर्वप्रथम registration complete करावे लागते तरच अर्ज करता येतो. अर्ज प्रक्रिया ही शेतकर्यांना अगदी सोपी व सोईस्कर बनवण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती/ अल्पभूधारक शेतकरी व बहुभूधारक शेतकरी/ महिला शेतकरी यांना 50% सब्सिडीवर तर इतर शेतकऱ्यांसाठी 40% सब्सिडी आहे. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाइलवरुन किंवा तालुक्याच्या कृषि सहाय्यक यांच्याकडून किंवा csc centre वर जाऊन पूर्ण करू शकता. अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने होईल व या प्रक्रियेत थोडा वेळही लागु शकतो. तुमची निवड झाल्यास तुम्हाला message द्वारे कळविण्यात येईल व तुम्ही संकेतस्थळावर जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता. येथे तुम्...
शेतकर्यांना शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कृषि यंत्रणा सब्सिडीवर अर्थसहाय्य म्हणुन उपलब्ध करून दिली जाते. यांपैकी सध्या सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपाविषयी आपण मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा हे बघणार आहोत. या पंपाची रचना बॅटरी चलित पंपासारखीच असून, या पंपाला सौरप्लेट जोडलेली असते. या अगोदर शेतकर्यांना बॅटरी चलित पंप 100% सब्सिडी वर उपलब्ध करून देण्यात आला होता व आता सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपसुद्धा 100% सब्सिडीवर उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ही अर्ज प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाइलवरुन सुद्धा पूर्ण करू शकता. जर तुम्हाला अर्ज प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषि सहाय्यक किंवा csc centre शी contact करू शकता. लॉटरी प्रक्रियेमध्ये निवड झाल्यास message द्वारे कळविण्यात येते, त्यानंतर कागदपत्रे upload करून तुम्हाला योजनेचा लाभ दिला जातो. अधिक माहितीसाठी तुम्ही mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. mahadbt farmer login या पर्यायावर click करून शेतीविषयक योजनेची माहिती घेऊ शकता. तसेच योजनेसाठी ला...